ग्रा.प. सदस्य स्वगृही यावा म्हणून सतीश सावंत यांचा दबाव….

ग्रा.प. सदस्य स्वगृही यावा म्हणून सतीश सावंत यांचा दबाव….

भाजपा प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांची सतीश सावंत यांचेवर टीका

शिवसेनेकडून विधानसभा लढविलेल्या व्यक्तीची गावातील अस्तित्वासाठी सुरू आहे धडपड

कणकवली
शिवसेनेतून विधानसभा लढविलेल्या एका उमेदवाराला आपल्या गावातील, जिल्हा परिषद मतदार संघातील ग्रामपंचायत सदस्यांचे पाय धरावे लागत, पक्ष सोडून जाऊ नका अशा विनवण्या कराव्या लागतात हे दुर्दैवी आहे. अशी टीका भाजपा प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांनी सतीश सावंत यांचेवर केली आहे.
राजकारणात आल्यापासून सतीश सावंत यांनी फक्त हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघात काम केले. त्यांचा गावाच्या राजकारणा पलीकडे कोठेही ठसा उमटला नाही. आज गावातच पक्षाला सुरुंग लागला त्यामुळे सतीश सावंत हादरले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली.भाजपा पक्ष आणि राणेंचे नेतूत्व आज सिंधुदुर्ग च्या प्रत्येक व्यक्तीला हवे हवेसे वाटू लागले आहे. त्यामुळे हरकुळ मधील असंख्य शिवसैनिक भाजपात दाखल झाले. त्यातील एका ग्रामपंचायत सदस्याच्या घरी जाऊन त्याला शिवसेना सोडू नको म्हणून विनवणी करावी लागली. घरोघरी फिरून भावनिक मुद्दे सांगून भाजपात गेलेल्या कार्यकत्याना परत पक्षात प्रवेश करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सतीश सावंत करत आहेत अशी टीका सुरेश सावंत यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा