You are currently viewing अभिनेता शर्मन जोशीला पितृशोक

अभिनेता शर्मन जोशीला पितृशोक

मुंबई :

थ्री इडियट्समधील राजू रस्तोगीची भूमिका साकारणाऱ्या शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे आज मुंबई येथे निधन झाले.

अरविंद जोशी यांनी अनेक नाटकांत काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहे. अरविंद जोशी यांच्या पश्चात पत्नीसह शर्मन जोशी आणि मानसी जोशी ही दोन मुले असून मानसी हिचे लग्न अभिनेता राहुल रॉय याच्याशी झाले आहे.

अभिनेता अरविंद जोशी यांनी शोले, ईतेफाक आदी हिंदी चित्रपटात काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 5 =