सावंतवाडी शहरांमधील धोकादायक व जीर्ण झालेली झाड पडण्याची सत्र सुरू.
सावंतवाडी
सदर झाड मालकांना जीर्ण व धोकादायक असलेल्या झाडांबद्दल येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने माहिती दिली होती त्यावर नगर परिषदेने सदर झाड मालकांना पत्र देऊन सुद्धा सदर झाड मालकांच्या निष्काळजीपणा मुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड बसला तीन दिवस लाईट नाही. व्यावसायिक व इतर नागरिकांना आतापर्यंत दहा ते बारा लाख पर्यंतरचे नुकसान सहन करावे लागत आहे तर सुदैवाने जीवित हानी टळली पण याला जबाबदार कोण असा सवाल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केला आहे.
आठ दिवसापूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात रस्त्यालगत धोकादायक असलेली झाडे किंवा त्याच्या फांद्या सदर झाड मालकाने तोडून घ्यावेत असे प्रसिद्धी माध्यमातून जाहीर केले होते.
असे असून सुद्धा व नगरपरिषदेने पत्रव्यवहार करून सुद्धा सदर झाड मालकांनी अद्यापही कुठच्याही प्रकारची कार्यवाही केली नाही व अजूनही निष्काळजीपणे शांत बसले आहेत त्याचा इतर नागरिकांना फार मोठा फटका बसला आहे.
सदर परिस्थितीमध्ये येथील सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद व एम ई सी बी रात्रंदिवस युद्ध पातळीवरती पडलेली झाड तोडण्याचं व रस्ता मोकळा करून लाईट सुरु करण्याचं काम करत आहे. परंतु झाड मालक अद्यापही सुशागात आहेत हे योग्य नाही असे मत रवी जाधव यांनी व्यक्त केले.
धोकादायक झाडांची माहिती देऊन सुद्धा आपण अजून शांत असाल तर विनाकारण त्याचा फार मोठा फटका येथील सर्वसामान्य जनतेला बसू शकतो याचा कृपा करून विचार करावा व इतर नागरिकांना सहकार्य करावे अशी नम्र विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.
माहिती देऊन तसेच पत्रव्यवहार करून सुद्धा धोकादायक झाडे तोडली गेली नाहीत यापुढे सदर झाड मालकाचे झाड पडून नुकसान झाल्यास होणाऱ्या नुकसानाचे सर्वस्वी जबाबदारी झाड मालकांनी स्वीकारावी.
