सावंतवाडी :
सावंतवाडी पोलीसांकडून न्हावेली येथील माऊली मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय दरम्यान अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली. यावेळी अंमली पदार्थ विरोधी घोषणाबाजी व नागरिकांना शपथ देण्यात आली. या रॅलीत पोलीस अंमलदार दिपक दळवी, पोलीस कॅान्स्टेबल नाईक, सरपंच अष्टविनायक धाऊसकर, पोलीस पाटील सावळाराम न्हावेलकर, वसंत न्हावेलकर, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन दळवी, ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, राजेश्वरी कालवणकर, सागर जाधव, आरती माळकर, निकिता परब, आरोग्य केंद्र कर्मचारी अधिकारी महिला बचत गट अध्यक्ष अनिता नाईक, आरती न्हावेलकर, काशीबाई नाईक, रिया सावळ, सुभद्रा न्हावेलकर, शुभांगी न्हावेलकर, वैशाली नाईक, आशा सेविका सविता मेस्री, सुमन नाईक, प्रतिष्ठान ग्रामस्थ राजन कालवणकर, अर्जुन जाधव, लिपिक कर्मचारी विनायक आरोंदेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

