वेंगुर्ले बाजारपेठमार्गे एसटी बस वाहतूक आज बंद.*
वेंगुर्ले,
वेंगुर्ले नगरपरिषद बाजारपेठेतील गटाराचे काम सुरू असल्याने २० रोजी बाजारपेठमार्गे एसटी बस वाहतूक एक दिवसासाठी बंद राहणार आहे. कुडाळ व सावंतवाडीवरून मठमार्गे ये-जा करणाऱ्या एसटी बसेस हॉस्पीटल नाका ते कॅम्प व वेंगुर्ले-तुळस मार्गावरील बॅ. नाथ पै रोडवरून होणार आहे, अशी माहिती वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी दिली आहे. शासनाकडून नगरपरिषदेस शहरातील गटाराच्या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील लोकमान्य मल्टिपर्पज बँक ते गाडीअड्डा तिठ्यापर्यंत जाणाऱ्या गटाराचे बांधकाम करण्याच्या कामास नगरपरिषदेने १९ मे पासून सुरूवात केली आहे. या गटाराचे खोदकाम करून काढलेली माती वाहतूक करण्याचे काम २० मे रोजी करण्यात येणार असल्याने, तसेच या कामामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून या रस्त्यावरील एसटी वाहतूक मंगळवार, २० मे रोजी पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी, असे वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे वेंगुर्ले आगाराच्या व्यवस्थापकांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार एका दिवसासाठी वाहतुकीत वरीलप्रमाणे बदल केला आहे, असे वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी म्हटले आहे.

