You are currently viewing दोडामार्ग येथील फ. रा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद – धर्मराज हांडे

दोडामार्ग येथील फ. रा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद – धर्मराज हांडे

पत्रकार अभिमन्यू लोंढेंना आदर्श पुरस्कार प्रदान

दोडामार्ग

कै. फटीराव रामचंद्र देसाई हे आदर्श व्यक्ती होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नावे असामान्य व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन पुरस्कार करत आहे, ही बाब खरोखरच गौरवास्पद आहे असे, मत शिव शंभू चरित्र व्याख्याते धर्मराज हांडे महाराज यांनी व्यक्त केले. आदर्श केर-भेकुर्ली गावात फ. रा प्रतिष्ठानच्या वतीने १२ व्या वर्षातील पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भोसले नाॅलेज सिटी चे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, सिंधू मित्र प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, विज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता प्रवीण परब, प्रतिष्ठान अध्यक्ष प्रेमानंद देसाई, डॉ. विद्यानंद देसाई आदी उपस्थित होते.
कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की फ. रा प्रतिष्ठान गेले एक तप उत्कृष्ट काम करत आहे. पुरस्कार देखील उल्लेखनीय व्यक्तींना देऊन जो कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याचे भरभरून कौतुक केले.
डॉ प्रवीण कुमार ठाकरे यांनी फ. रा प्रतिष्ठानने व्याख्याते धर्मराज हांडे महाराजांना आणून अर्धा महाराष्ट्र काबीज केला आहे. येणाऱ्या काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्र हे प्रतिष्ठान व्यापेल. प्रेमानंद देसाई जे सामाजिक ऋण फेडत आहेत, त्याचे दुसरे मूल्य नाही, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यावर्षीचे १४ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले.
या पुरस्काराचे मानकरी आदर्श शिक्षक फरा पुरस्कार वंदना नारायण राणे शाळा कणकवली नंबर दोन, अध्यापन भास्कर फरा पुरस्कार स्नेहल सदाशिव गवस मुख्याध्यापिका, आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमन्यू लोंढे (सावंतवाडी), नाट्य रंगकर्मी शिवप्रसाद उर्फ शिवा मेस्त्री, सौ हेमावती स्मृती महिला स्वावलंबन पुरस्कार अर्चना आसोलकर (आसोली), आरोग्य सेवा पुरस्कार डॉ. गोविंद शिवराम उर्फ दाजी देसाई, स्मार्ट ग्राम पुरस्कार निरवडे ग्रामपंचायत सरपंच सुहासिनी सुहास गावडे, आदर्श कृषी रत्न पुरस्कार शिवप्रसाद काशिनाथ देसाई (बांदा), आदर्श पत्रकार युवा प्रेरणा फ.रा पुरस्कार प्रवीण वामन परब (मडुरा), संगीता शामसुंदर स्मृती आदर्श संगीत पुरस्कार विश्वासराव फक्रोजी देसाई (कळणे), शैला स्मृती आदर्श दिव्यांग पुरस्कार दशरथ परशुराम देसाई (केर), आदर्श जनसेवा पुरस्कार शिवम संतोष कोरगावकर, प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार चंद्रकांत उर्फ कांता मेस्त्री (ओटवणे) यांना वितरित करण्यात आला. कृष्णा कुंभार मूर्तिकार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला‌. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस देसाई, प्रवीण परब, प्रास्ताविक ॲड पी. डी. देसाई तर आभार प्रतिष्ठान अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + twenty =