You are currently viewing विजयदुर्ग-तळेरे मार्गावर कार आणि चिरेवाहू ट्रक मध्ये झालेल्या अपघातात एक महिला गंभीर, सहा प्रवासी जखमी

विजयदुर्ग-तळेरे मार्गावर कार आणि चिरेवाहू ट्रक मध्ये झालेल्या अपघातात एक महिला गंभीर, सहा प्रवासी जखमी

विजयदुर्ग-तळेरे मार्गावर कार आणि चिरेवाहू ट्रक मध्ये झालेल्या अपघातात एक महिला गंभीर, सहा प्रवासी जखमी

कणकवली

विजयदुर्ग-तळेरे मार्गवर आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास चारचाकी आणि चिरेवाहू ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात चारचाकी मधील सात प्रवाशांपैकी एक गंभीर तर अन्य सहा किरकोळ जखमी आहेत. पाऊस पडत असल्‍याने रस्ता निसरडा झाला. त्‍यामुळे हा अपघात झाल्‍याचे स्थानिकांतून सांगण्यात आले. गंभीर जखमींवर ओरोस तर अन्य जखमींवर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. दारुम आणि बुंरंबावडे गावाच्या सिमेवर हा अपघात घडला.

या अपघातात चारचाकी मधील सुप्रिया सुनिल जावकर, वय ५६,सुनिल पांडुरंग जावकर,वय ६०, सनैना सुधीर जावकर,वय ६५,सुजाता संदिप फणसेकर, वय ५०, दिपा संदिप फणसेकर,वय १९,हर्ष संदिप फणसेकर, वय १६,प्रसाद सुधीर जावकर,वय ३५ ,सर्व रा. विजयदुर्ग हे जखमी झाले असून या सर्वाना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दिपा संदिप फणसेकर या गंभीर दुखापत असल्याने त्याना ओरोस येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा