You are currently viewing खा.नारायण राणे यांनी चुकीच्या कामकाजावर सभा अध्यक्ष, जिल्हाधिकारी, नियोजन अधिकारी यांना विचारला जाब.

खा.नारायण राणे यांनी चुकीच्या कामकाजावर सभा अध्यक्ष, जिल्हाधिकारी, नियोजन अधिकारी यांना विचारला जाब.

जिल्हा नियोजन समिती सभेचा प्रारंभ वादळी

ओरोस
मागील सभेमध्ये ठरलेली कामे बदलण्याचा अधिकार सभा अध्यक्षांना आहेत काय ?असा सवाल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी नियोजन समितीच्या बैठकीला सुरवातीलाच उपस्थित केला.आणि जिल्हाधिकारी यांना जाब विचारला. कामे बदलली कशी? असे बदल करता येतात काय जिल्हा नियोजन समितीची त्यासाठी पुन्हा बैठक झाली होती काय ? अशा विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री समर्पक उत्तर देऊ शकले नाही.

त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी बदललेल्या कामांची यादीच सांगितली.त्यानंतर भाजपा चे सदस्य आणखीनच आक्रमक झाले.त्यानंतर सदस्यना शांत करत खासदार नारायण राणे यांनी अशी चूक होणार नाही याची ग्वाही पालकमंत्री यांनी द्यावी असे सांगितले.त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी असे बदल या पुढे केले जाणार नाहीत.सदस्यांनी सूचित केलेली कामे बदलणार नाही.असे सांगितले.

१४३ कोटीच का आले ? जे आलेत ते परत जाणार नाहीत याची खात्री देता असे विचारताना खासदार राणे यांनी
ठाणे जिल्ह्यात जास्त निधी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी कसा ? याचा अर्थ एकनाथ शिंदे यांची जास्त ताकद आहे असे म्हणायचे काय ? असा मिस्कील सवालही केला. दरम्यान २५ लखापेक्षा जास्त निधी प्रत्येक सदस्यांना दिला जाईल असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा