You are currently viewing कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थांची नोंदणी करण्याचे आवाहन…

कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थांची नोंदणी करण्याचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत उमेदवारांना विविध रोजगार व उद्योजकता विषयी प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षण विषयी कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय  व अशासकीय विद्यालय, महाविद्यालय, औद्योगिक अस्थापना, महामंडळ, सर्व औद्यगिक संघटना, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्याकडे सूचिबद्ध असलेल्या प्रशिक्षण संस्था यांनी कार्य करित असलेल्या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग पार्टनर, ट्रेनिंग सेंटर म्हणून नोंदणी केल्यानंतर जिल्ह्यातील स्कील गॅपच्या अधारे विविध प्रशिक्षण वर्गांचे जॉब रोल घेऊन नोंदणी करावी.

       तरी ट्रेनिंग पार्टनर, ट्रेनिंग सेंटर म्हणून नोंदणी करण्यास इच्छुक असल्यास शासनाच्या https://skillindia.nsdcindia.org या लिंकवर जाऊन आपल्यास्तरावर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन सुनिल पवार, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी .2362-228835 या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 1 =