मोर्ले गावचे माजी सरपंच महादेव गवस यांचे निधन
दोडामार्ग:
मोर्ले गावचे माजी सरपंच व मोर्ले गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष कै.महादेव पांडूरंग गवस (वय – ५८) यांचे बुधवार दी १४ मे रोजी रात्री १०.४५ च्या दरम्यान गोवा बांबोळी येथील मेडिकल कॉलेज मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.गेले आठ दिवस त्यांच्यावर बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.पत्रकार तथा युवा कोकण डिजिटल मीडिया चॅनलचे संपादक, व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गवस यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा, बहीण असा परिवार आहे.त्यांच्या निधनामुळे मोर्ले दशक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.