जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व कार्यालयाकरीता तीन स्थानिक सुट्या जाहिर
सिंधुदुर्ग
सन 2025 या वर्षा करीता जिल्ह्यातील महसूली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरीता नागपंचमी 29 जुलै 2025, हरितालिका 26 ऑगस्ट 2025, नरक चतुर्दशी (दिवाळी) 20 ऑक्टोंबर 2025 अशा तीन स्थानिक सुट्या जिल्हा प्रशासनातर्फे जाहिर करण्यात आल्या आहेत.