प्रशिक्षक भरत अरून यांनी सांगितला कर्णधार कोहली आणि राहणे मधील फरक

प्रशिक्षक भरत अरून यांनी सांगितला कर्णधार कोहली आणि राहणे मधील फरक

भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोघांचं नेतृत्त्व कसं भिन्न आहे यावर भाष्य केलं आहे.

विराट कोहली पॅटर्निटी लीव्हवर गेल्यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवला. रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलसोबत बोलताना भरत अरुण म्हणाले की, “अजिंक्यबद्दल बोलायचं झाल्यास तो अतिशय शांत व्यक्ती आहे. रहाणे बाहेरुन मृदू वाटत असला तरी आतून अतिशय कणखर आहे. तो आपल्या खेळाडूंचं समर्थन करतो आणि कायम शांत असतो. गोलंदाजांनी चूक जरी केली तरी ते त्याला घाबरत नाही. कारण गोलंदाजांना माहित असतं कर्णधार आपलीच साथ देणार आहे. परंतु विराट कोहलीच्या बाबतीत उलट आहे. जर तुम्ही वाईट गोलंदाजी केली तर कोहली रागावू शकतो असं वाटू शकतं. पण ही त्याच्यातील एनर्जी अर्थात ऊर्जा असते.”मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. रविचंद्रन अश्विनच्या यू ट्यूब चॅनलवर भरत अरुण म्हणाले की, “अजिंक्य रहाणे एवढा शांत व्यक्ती आहे की, गोलंदाजांना रणनीतीनुसार कामगिरी करण्यास अपयश आलं तरी ते त्याला घाबरत नाहीत. पण नियमित कर्णधार विराट कोहलीच्या एनर्जीला अनेक वेळा त्याचा राग समजला जातो.” भरत अरुण यांनी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोघांचं नेतृत्त्व कसं भिन्न आहे यावर भाष्य केलं.

भारताच्या कोणत्याही­ गोलंदाजाच्या चेंडूवर चौकार गेल्यास रवी शास्त्री माझ्यावर ओरडतात. गोलंदाजाने एकही धाव न देता केवळ विकेट्स घ्याव्यात अशी रवी शास्त्रींची कायम इच्छा असते. एखाद्या गोलंदाजाने सलग दोन चौकार दिले तर ते आरडाओरडा करतात. जर गोलंदाजाने चौकार दिला तर मला समजतं की आता ते माझ्यावर नक्कीच ओरडणार आहे, असं भरत अरुण म्हणाले. “तर अजिंक्य रहाणे शांतचित्त असलेला माणूस आहे. गोलंदाजांना रणनीतीनुसार कामगिरी करण्यास अपयश आलं तरी ते त्याला घाबरत नाहीत, उलट नियमित कर्णधार विराट कोहलीला गोलंदाज घाबरतात, कारण विराट रागावू शकतो हे त्यांना माहित असतं,” असं अरुण यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा