You are currently viewing इचलकरंजीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तैलचिञ प्रदान

इचलकरंजीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तैलचिञ प्रदान

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात
कार्यकुशल आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त शहरातील विविध ठिकाणच्या श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शाखांना कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तैलचिञ प्रदान करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन महाजन गुरुजी यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी मोगलांशी दोन हात करत स्वत:च्या प्राणाचे बलिदान दिले आहे.त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने बलिदान मास म्हणून शहरातील विविध ठिकाणी दररोज सायंकाळी ध्येयमंञ व विविध प्रार्थना केली जाते.धर्मवीर छञपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे व बलिदानाचे स्मरण चिरंतन रहावे त्याचबरोबर नव्या पिढीमध्ये
देशभक्तीची भावना जागृत व्हावी ,
याच जाणीवेतून आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे
इचलकरंजी शहरातील लंगोटे मळा ,दातार मळा , लिंबू चौक ,तांबे मळा ,शेळके मळा यासह विविध ठिकाणच्या श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शाखांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तैलचिञ प्रदान करण्यात आले.प्रारंभी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तैलचिञाचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी श्री महाजन गुरुजींनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेवून समाजातील प्रत्येकाने देशाच्या विकासात भरीव योगदान द्यावे , असे आवाहन केले.
यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे संचालक सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते
राजेंद्र बचाटे, संयोजक संजय आरेकर, सुभाष शेळके,विजय चव्हाण, संतोष शेळके,अशोक कुंभार, स्वप्नील पाटील,सूरज इंगळे, विजय देसाई, रवी लांडगे ,महादेव नलवडे , राहुल जगताप , किशोर निंबाळकर ,अजय  राठोड, अक्षय लोहार, सौरभ शेळके, तेजस शेळके, गणेश शेळके, नामदेव माळकर,  सतिश माने, अक्षय मगदुम, सचिन कांबळे आदींसह शिवशंभू प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 4 =