उभादांडा-मुठ येथील केपादेवीचा वर्धापन दिन 17 रोजी
वेंगुर्ले
उभादांडा-मुठ येथील श्री केपादेवीचा वर्धापन दिन सोहळा धार्मिक विधी व कार्यक्रम शनिवार दि. 17 मे रोजी सकाळी 8 ते 10 वाजता श्री केपादेवी मातेचा अभिषेक, सकाळी 10 ते 12 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 ते 12.30 वाजता श्री सत्यनारायण आरती, दुपारी 12.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 7 वाजता सुश्राव्य भजन, रात्रौ 10 वाजता चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कवठी (ता. कुडाळ) यांचा महान पौराणिक त्रेता युगातील अकरा मुखी मारूतीचे रहस्य उलघडा करून देणारा संघर्षमय ट्रिक्सीन युक्त दशावतार नाट्य प्रयोग “एकादुरामुख” असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी बहुसंख्येने अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन श्री केपादेवी देवस्थान कमिटी व विश्वस्त, श्री केपादेवी देवस्थान उत्सव उपसमिती, मुठ उभादांडा वेंगुर्ला यांनी केले आहे.