जिल्ह्यात कणकवली पोदार इंटरनॅशनल स्कूल अव्वल
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल : विद्यार्थ्यांचे १०० टक्के निकालासह यश
कणकवली :
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये कणकवलीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये अग्रेसर असणारे व अनेक विविध उपक्रमांसहित आधुनिक शिक्षण पद्धतींवर भर देऊन शिक्षणाचा वसा देत असणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली या शाळेचा १०० टक्केनिकालासह विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये नेत्र दीपक असे यश संपादन केले आहे. यामध्ये पर्णा पराग नायगावकर हिने ९८.८ टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला आहे. मानसी प्रशांत बोभाटे हिने ९८.६ टक्के गुण प्राप्त करत द्वितीय, सृष्टी संजय सावंत ९८.४ टक्के गुण प्राप्त करत तृतीय, उर्वी हर्षल गवाणकर व सोहम संदीप ढेकणे यांनी ९८ गुण प्राप्त करत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये एकूण १६ विद्यार्थ्यानी ९० टक्के च्या वरती गुण प्राप्त केले आहेत.
यामध्ये पर्णा नायगावकर (९८.८), मानसी बोभाटे (९८.६), सृष्टी सावंत (९८.४), उर्वी गवाणकर (९८), सोहम ढेकणे (९८), मिहीर सावंत (९७.२), पल्लवी कुमारी (९६.८) वेद रेगे (९६.६). भव्य सावंत (९५.६), गार्गी कांबळी (९५.४), दीक्षा जाधव (९४.८), वेदिका काजरेकर (९३.८), मिनल सुलेभाती (९२.८), अनुष्का चव्हाण (९१.२), अथर्व तळेकर (९०.६), आर्या केसरकर (९०.४), गुणांकन प्राप्त केले असून ८० ते ९० च्या टक्केवारी मध्ये ७ विद्यार्थी, ७० ते ८० च्या टक्केवारी मध्ये ८ विद्यार्थी, ६० ते ७० च्या टक्केवारी मध्ये ७ विद्यार्थी, तर ५० ते ६० च्या टक्केवारी मध्ये २ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. पोदार इंटरनॅशनल स्कूलचे जनरल मॅनेजर कर्नल एस. पी. कुलकर्णी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शाळेच्या प्राचार्या राणी मारिया झेवियर, शाळेचे प्रशासकीय अधिकारी अक्षय पेंढारी व सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*पहिल्याच वर्षी १०० टक्के यश*
कणकवली येथे पोदार इंटर्नेशनल स्कूलची स्थापना पाच वर्षांपूर्वी झाली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला दहावीची पहिलीच बॅच होती. या पहिल्याच बॅचमध्ये शाळेने १०० टक्के यश मिळविले आहे. तसेच सीबीएसईच्या सिंधुदुर्गमध्ये असलेल्या शाळांमध्येही टॉपर राहून उज्ज्वल यश संपादन केले आहे