*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व यांच्या विद्यमाने मंगळवार दिनांक 13/05/20250 रोजी हिर्लोक पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये हिर्लोक गावचे सरपंच माननीय प्राची सवांत , बचतगट महिला CRP व ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी प्रणाली दळवी, संजना गावडे,दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच प्राची सावंत यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले.संस्था कर्मचारी दळवी मॅडमानी संस्थेचे अहवाल वाचन केले. दिव्यांग बांधवांना गाडीसाठी फॉर्म देण्यात आले त्यासंबंधी सर्व माहिती सांगितली. चार दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली.या निलेश नाईक यांना व्हीलचेअर देण्यात आली .तसेच अक्षय तावडे यांना पंचायत समितीच्या माध्यमातून तीन चाकी गाडी मिळून देण्यात आली .व संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर व हिर्लोक गावच्या सरपंच प्राची सावंत यांनी पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून गाडीचे उद्घाटन केले अक्षय तावडेला शुभेच्छा दिली .या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते.चहा व नाश्ताची व्यवस्था हिर्लोक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.