You are currently viewing पोलीस अधिकारी हेमंत राणे यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड

पोलीस अधिकारी हेमंत राणे यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड

हेमंत राणे कांदळगाव मालवणचे सुपुत्र

मालवण

मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी हेमंत नागेश राणे यांची पोलीस दलातील गुणवत्तापूर्णक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकासाठी निवड झाली आहे. राणे यांच्या पोलीस दलातील गेली ३४ वर्षे करीत असलेल्या सेवेतील कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कांदळगाव राणे वाडी येथील सुपुत्र असणाऱ्या हेमंत राणे यांनी मार्च १९८७ रोजी पोलीस शिपाई पदावर सेवेस प्रारंभ केला. त्यांनी मुंबई शहरात जास्त काळ सेवा बजावली आहे. त्यांनी क्राईम बँचमध्ये काम केले असून त्यांनी अनेक गँगस्टर्सवर कारवाई केली आहे. खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला आहे. २००९ मध्ये तत्कालीन पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरवास्पद कार्याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला होता. सध्या ते मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =