प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा आम. दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत प्रवेश
सावंतवाडी :
माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर, उप तालुकाप्रमुख जीवन लाड, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सुरज परब, विभाग प्रमुख संजीव पालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उबाठा गटाच्या सांगेली माजी सरपंच रमाकांत रावजी राऊळ, माजी सरपंच सुवर्णा सुरेश राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक मोहन सांगेलकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश न्हानु राऊळ, वासू होडावडेकर, युवा कार्यकर्ते विकास राऊळ, रोशन राऊळ, सुरेश राऊळ, भाग्यश्री राऊळ, बाबुराव राऊळ, संजय देसाई, संजय राऊळ, राजन सांगेलकर, सुभाष राऊळ आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.