You are currently viewing इन्सुली माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

इन्सुली माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

सावंतवाडी :

विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नुतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. प्रशालेतून कु. रेश्मा संदेश पालव हिने ९९. ४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर कु. जितेश गोकुळदास पोपकर याने ९३. ६० गुण मिळवून दृतीय तर कु.भुंजल दिनेश गावडे हिने ९३. ४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. गेली अनेक वर्षे प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागत असुन प्रशालेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे इन्सुलि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. विद्या विकास मंडळ संचलित नुतन माध्यमिक विद्यालयातून दहावी परीक्षेत ३८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अशोक सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, उपाध्यक्ष महेंद्र सावंत, खजिनदार सदा कोलगावकर, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, उपसरपंच वर्षा सावंत, मुख्याध्यापक सुविद्या केरकर यांनी अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा