You are currently viewing कुडाळ हायस्कूल मध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव ‘ कार्यक्रम उत्साहात         

कुडाळ हायस्कूल मध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव ‘ कार्यक्रम उत्साहात        

कुडाळ :

कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव इ पाचवी’ हा कार्यक्रम अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात नुकताच संपन्न झाला. जून महिना सुरू होताच शाळा प्रवेशाचे वेध लागतात. विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश आनंददायी होण्यासाठी संस्था पदाधिकारी का. आ. सामंत यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सरकार्यवाह अनंत वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख उदय शिरोडकर, सिव्हील इंजिनियर व प्रशालेचे माजी विद्यार्थी संजय पिंगुळकर, संस्थेचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, सहकार्यवाह सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक दिनेश आजगावकर, उपमुख्याध्यापक महेश ठाकूर इत्यादी उपस्थित होते. श्रुती सावंत हिचे भक्तीगीत गायन, सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात

पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उदय शिरोडकर व संजय पिंगुळकर यांचा अनुक्रमे अनंत वैद्य व सुरेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे उदय शिरोडकर यांनी ‘आपल्या शाळेचा अभिमान बाळगा. अधिकाधिक अभ्यास करून आपले ध्येय गाठा’ असा आशीर्वाद मुलांना दिला. संजय पिंगुळकर यांनी कुडाळ हायस्कूल मधील भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी ‘भाषेचा अभिमान बाळगा. अभ्यासाबरोबर विविध कलांचा ध्यास घ्या’ असा सल्ला मुलांना दिला. आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक दिनेश आजगावकर यांनी शाळेच्या ध्येय धोरणाचा आढावा घेत मुलांमध्ये पर्यावरणीय विचार निर्माण व्हावा म्हणून विविध फळांच्या बिया शाळेमध्ये गोळा करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी विद्यार्थी मनोगतामध्ये प्रारब्ध बर्डे व कृतिका कुडाळकर यांनी तर पालकांच्यावतीने सौ सुवर्णा प्रभू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निखिल ओरसकर यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी पथक सौ शिल्पा परब यांच्या नेतृत्वाखाली गाईड पथक तर चंद्रशेखर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभागाने उत्तम प्रकारे सहकार्य केले. उदय वेलणकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ओम वारंग व अन्वय मुतालिक यांनी बासरी वादन शुभम पिंगुळकर, कुमारी समृद्धी सावंत व अथर्व आजगावकर यांनी संगीतमय वाद्य वादन केले. आभार महेश ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र गोसावी यांनी केले. फुग्यांची सजावट चेतन ठाकूर या माजी विदयार्थ्यांने केली. मुलांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्राजक्ता ठाकूर, प्रियंका पोटे, शलाका गंगावणे, एन पी दरवडा, आर सी खाकर, राजाराम तोरस्कर, एकनाथ जाधव, सिद्धार्थ जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + one =