*“विनायकनामा व कुसुम” पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात: माणुसकीचा सुगंध लाभलेला आगळा सोहळा!
डोंबिवली(प्रतिनिधी) –
लेखक रमेश मारुती पाटील यांच्या “विनायकनामा” आणि लेखक रफिक इनामदार यांच्या “कुसुम” या दोन भावस्पर्शी साहित्यकृतींचा संयुक्त प्रकाशन सोहळा अलीकडे अत्यंत आत्मीय आणि माणुसकीच्या ऊबेत पार पडला. या सोहळ्याने केवळ पुस्तकं प्रकाशित केली नाहीत, तर नात्यांचा एक नवा अध्याय लिहिला.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सौ. सोनाली महेश फडके व श्री. महेश फडके होते. त्यांच्या संयोजनात पार पडलेला हा सोहळा म्हणजे घरगुती प्रेमाचा आणि साहित्यिक सौंदर्याचा संगम ठरला.
अध्यक्षस्थान भूषविलेले आदरणीय ‘नमाई’ सुभाष नाईक यांनी आपल्या समर्पक भाषणातून “विनायकनामा”च्या सामाजिक आणि भावनिक पैलूंना उलगडलं. प्रमुख अतिथी प्रा. नरेंद्र मोहन कदम यांनी “लेखन म्हणजे आत्मशोध” हे प्रतिपादन करत लेखकाच्या अंतरंगाचा वेध घेतला.
विशेष अतिथी म्हणून श्री. उत्तमराव दासू तरकसे (क्राईम ब्रांच, नवी मुंबई) आणि मातृतीर्थ सिंदखेडराजाचे १४वे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधवराव यांची उपस्थिती हा सोहळा अधिक समृद्ध करणारा ठरला. त्यांच्या विचारांनी आणि साधेपणाने सर्वांची मने जिंकली.
कविसंमेलनातील कविंची हजेरी खास उठावदार ठरली.
श्री. सुनील पाटील (भिवंडी), सौ. मीनल कांबळे (ठाणे), आणि श्री. मकरंद वांगणेकर (कल्याण) यांनी आपल्या काव्यसादरांनी वातावरण भारून टाकले.
प्रकाशक रोहिणी वाघमारे (रोहिणी पब्लिकेशन) यांच्या कार्यासाठी विशेष उल्लेख केला गेला. सूत्रसंचालन अँड. रोहिणी जाधव यांनी ओघवत्या शैलीत केल्याने संपूर्ण कार्यक्रमात एकसंधता आणि गती जाणवली.
या सोहळ्याची खासियत म्हणजे प्रेमापोटी उपस्थित राहिलेली माणसं.
सुनंदा मराठे, संजीवनी कारंडे व भाईंदर परिवार, राकेश देशमुख व कुटुंब, नंदा कोकाटे, सानिका कुपाटे व परिवार,रघुनाथ मोहिते ,अंधेरी यांच्यासारख्या आपुलकीने नांदणाऱ्या व्यक्तींची उपस्थिती म्हणजे प्रेमाचं प्रत्यक्ष दर्शन होतं.
याशिवाय ज्यांची नावे घेता आली नाहीत, पण उपस्थित राहून मनापासून साथ दिली, अशा सर्व प्रेमळ अतिथींचे लेखक रमेश पाटील यांनी हृदयपूर्वक आभार मानले.
“विनायकनामा” ही कादंबरी आजच्या माणसाच्या भावनिक शोधाची कथा आहे, तर “कुसुम” एक ओघवती तीन मित्रांच्या मैत्रीची कथा. या दोन्ही पुस्तकांनी वाचकांच्या मनात नक्कीच दीर्घकालीन ठसा उमटवणार, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*
संजिवनी नर्सिंग कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२५-२६*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
२ रा मजला,वांगडे शॅापिंग कॅाम्प्लेक्स,बहादुरशेख नाका,चिपळूण,
संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज,
मंदार कॅम्पस, पेढांबे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी
या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२५/२६* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
(महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त)
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.
वैशिष्ट्ये-ः
– अत्याधुनिक प्रयोगशाळा
– उच्चशिक्षित प्राध्यापक
– हवेशीर वर्गखोल्या
– परदेशी नोकरीसाठी मुलाखत परिक्षा तयारी
– १००% नोकरीची हमी
– उज्वल परंपरा लाभलेले कोकणातील एकमेव पॅरामेडीकल कॅालेज
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
+91 721-8850223,
+91 721-8850220,
*📲7276850220,
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.
