You are currently viewing ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी सावंतवाडीत अनोखे आंदोलन…

ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी सावंतवाडीत अनोखे आंदोलन…

सावंतवाडी
महाकवी ग. दि. माडगूळकर यांचे पुणे येथे स्मारक व्हावे, यासाठी सावंतवाडीतील गदिमा प्रेमी कलावंत साहित्यिक यांच्या वतीने आज त्यांच्या 14 डिसेंबर पुण्यतिथी दिनानिमित्त अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे .कवितांचा जागर करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.मोती तलावाच्याकाठी राम मंदिराच्या समोरील कट्यावर आज सकाळी ग.दि.मा. प्रतिमेला ज्येष्ठ लेखक कादंबरीकार प्रा. जी. ए.बुवा यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी या आंदोलनाचे प्रमुख कोमसापचे अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर,उपाध्यक्ष अड. संतोष सावंत,प्रा. रुपेश पाटील बाळकृष्ण लळीत,शामसुंदर नाडकर्णी, महेश आरोलकर, सहदेव धरणे, डॉ.मधुकर घारपुरे नरेश अकेरकर,किशोरी गव्हाणकर, घनशाम गावडे, सुधाकर जोशी, विद्या लळीत, सविता लळीत,यशवंत अमोल मेकर आदी उपस्थित होते.
यावेळी गदिमांच्या कविता व गीत सादर करण्यात आल्या. उद्धवा अजब तुझे सरकार या गीताच्या जागराने आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर कानडा-राजा-पंढरीचा, फिरत्या चाकावरती देसी अशी एक गीत गाऊन हे स्मारक लवकरात लवकर व्हावेत अशी मागणी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − six =