दोडामार्ग तालुक्यात एस.टी. च्या फेरीत १३ मे पासून बदल
प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन
दोडामार्ग
सावंतवाडी आगारातील दोडामार्ग तालुक्यातील एस.टी.च्या फेरीत मंगळवार दिनांक १३ मे २०२५ पासून खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन परिवहन विभागाचे अधिकारी यांचे कडून करण्यात आले आहे.
सावंतवाडी-दोडामार्ग ही बस बांदा, कोलझर, कुंब्रल-भरपाल मार्गे येणार असून सावंतवाडी येथून सकाळी ७.१५ सुटणार असून दोडामार्ग येथे ९.१५ पोहचणार आहे . दोडामार्ग -तिलारी ही बस सकाळी दोडामार्ग हुन सकाळी १० सुटणार तिलारी येथे १०.३० वाजता पोहोचणार आहे. तिलारी-दोडामार्ग ही बस सकाळी १०.४० मिनिटांनी तिलारीतुन सुटणार व दोडामार्ग ला ११.१० वा. पोहोचणार आहे. दोडामार्ग -बेळगाव ही बस भेडशी- तिलारी मार्गावरुन दोडामार्ग शहरातून ११.४५ मिनिटांनी सुटणार व बेळगाव येथे २.४५ वाजता पोहोचेल
बेळगाव -सावंतवाडीही बस पाटणे फाटा , चंदगड फाटा, आंबोली मार्गे बेळगाव येथून संध्याकाळी ४ वाजता सुटणार व ७.१५ मिनिटांनी सावंतवाडी येथे पोहोचणार आहे.

