*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वाटसरू*
**********
मी एक पथीक वाटसरू
चालतो जगती निश्चिन्ती
जन्मदान हे परमात्म्याचे
जन्मच मानवी भाग्यवंती….
दाता कृपाळू तो आगळा
त्याच्या त्या अगम्य लिला
प्रारबद्धाचेच खेळ संचिती
भोगावे लागती आत्म्याला….
सृष्टी तर प्रकृती भगवंताची
माहोल सारासारा भारलेला
ऋतूऋतुंचे हे अगम्य सोहळे
आव्हानच देती या चैतन्याला
आपण जरी असू वाटसरू
अंतरी जपूनीया विवेकाला
सदासर्वदा होवूनी अंतर्मुख
नित्यची भजावे भगवंताला…
**********************
*( 47 )*
*©️वि.ग.सातपुते. (भावकवी )*
*📞( 9766544908 )*
