*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा जनसंपर्क अधिकारी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लावणी*
*बैठकीची लावणी : भेट*
जीव जडला खासा तुम्हावरी बाई राजसा
रंगमहाली येता जाता ख्यालीखुशाली पुसा
शशीकिरणाने उजळते तुमचा संग मिळता रात
मनकवडा असा दिलबर जाणून घेता बात
तुम्हामुळे रंगात येतो इश्क दरबारी जलसा
रंगमहाली येता जाता ख्यालीखुशाली पुसा
नसता तुम्ही मन लागेना देह होई हा पिसा
काही रुचेना जीवा काया होई तोळामासा
कुडित येते पंचप्राण ऐकता भेटीचा संदेसा
रंगमहाली येता जाता ख्यालीखुशाली पुसा
विरहात जळतो जीव चपलांगी काया गोरी
हळूच येता डोळे झाकता असता पाठमोरी
यावं हरघडी राजसा भागवा भेटीची पिपासा
रंगमहाली येता जाता ख्यालीखुशाली पुसा
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664