You are currently viewing कणकवली श्री. स्वयंभू मंदिर येथे आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक हस्ते महारुद्रभिषेक

कणकवली श्री. स्वयंभू मंदिर येथे आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक हस्ते महारुद्रभिषेक

कणकवली :

कुडाळ मालवणचे आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिम्मित शनिवार सकाळी कणकवली ग्रामदैवत श्री. स्वयंभू मंदिर येथे आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांच्या हस्ते महारुद्र करण्यात आले.

कणकवली स्वयंभू मंदिर महारुद्र निमित्त आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिसानिमित्त मानकरी (जाणते) प्रकाश राणे यांनी स्वयंभू चरणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना सर्व कार्यात यश लाभो, उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, नगरसेवक कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, शहर समन्वयक तेजस राणे, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर, राजू राठोड, संतोष राणे, बबन राणे, सदा राणे, अंबाजी राणे, मंगेश राणे, महेश राणे, परेश बागवे, जितेंद्र राणे, प्रतीक रासम, योगेश मुंज, श्रवण राणे, सूर्याजी राणे, राजू गुरव, उदय सर्पे आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा