आतुरले मन । द्यावी मज् भेट । सोडवावे थेट । विठूराया……
कवीश्रेष्ठ ना .घ देशपांडे यांच्या स्मृती दिनी ‘ कवी मनोहर पवार यांचे अभंग गायन.
२५ व्या पुण्यस्मरणानिमित मेहकर जि बुलढाणा येथे ना .घ. यांच्या जन्मगावी राज्य स्तरीय काव्य संमेलन घेण्यात आले. त्यात पुस्तके प्रकाशन झाले . तसेच महाराष्ट्राचे लाडके जेष्ठ कवी शिळ ‘ कार ना .घ . देशपांडे यांना काव्यात्मक आदरांजली ही वाहण्यात आली . काव्यप्रेमी मंच मेहकर, आणि अखिल भारतीय साहित्य परिषद मेहकर यांच्या वतीने स्थानिक जिजामाता कन्या महाविद्यालय मेहकर येथे जयश्री कविमंडन कार्याध्यक्ष आणि सचिव रामदास राजेगावकर यांच्या पुढाकाराने सदर कार्यकम आयोजित करण्यात आला होता . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख व वऱ्हाडी कवी, डॉ. राजा धर्माधिकारी परतवाडा हे उपस्थित होते .कार्यकमाचे बहारदार सुत्रसंचालन कवी साहित्यिक संजय भारती यांनी संभाळले . प्रथम श्रेष्ठ कवी ना .घ . देशपांडे यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते पुष्पमाला घालन्यात आली. स्वागत गीता नंतर कवी वसंत गीरी यांच्या व अभीम न्यु मगर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन कवी राजा धर्माधिकारी आणि उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर जयश्री कवी मंडन यांनी प्रास्ताविक करून कवीसंमेलन सुरु झाले. त्यात कवी रामदास कोरडे, शत्रुघन कुसुंबे, संजय हिवाळे केळवद, शाहीर ईश्वर नगर, आदी कविंनी सुंदर रचना सादर केल्या. यावेळी शाहीर कवी, मनोहर पवार यांनी उत्कृष्ठ अभंग गेयरचना सादर करून वातावरण मंत्रमुग्ध भक्तीमय केले . राम जाधव बुलढाणा, विजय पळसकर डोणगांव, वसंत गीरी, संजय भारती हिवराश्रम, प्रा . मगर, संदिप गवई, कु . संघमित्रा गवई, दत्ता पवार, अशोक सारडा यांच्या तर रामदास राजेगांवकर, उमा देशपांडे,निरज देशपांडे, जयश्री कविमंडन आदींच्या सुंदर बहारदार काव्य रचना सादर झाल्या . त्यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष राजाभाऊ धर्माधिकारी यांनी विनोदी देश भक्ती पर विशेष रचना सादर केल्या . चहा फराळ घेवून कार्यक्रम संपन्न झाला.