सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, 11 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारी 12.20, वाजता चिपी विमानतळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आगमन, दुपारी 12.25, वाजता हेलिकॉप्टरने टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड मालवणकडे प्रयाण, दुपारी 12.35 वाजता, हेलिपॅड- टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन. दुपारी 12.40 वाजता मोटारीने राजकोट किल्ला मालवणकडे प्रयाण, दुपारी 12.45 वाजता, राजकोट किल्ला मालवण येथे आगमन, दुपारी 12.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभास उपस्थिती (स्थळ :- किल्ले राजकोट, ता. मालवण), दुपारी 1.45 वाजता, मोटारीने हेलिपॅड-टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडकडे प्रयाण, दुपारी 1.50 वाजता, हेलिपॅड -टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड, येथे आगमन, दुपारी 1.55 हेलिकॉप्टरने करंजे तालुका कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 2.05 वाजता, करंजे गोशाळा हेलिपॅड, कणकवलीकडे आगमन, दुपारी 2.10 वाजता, मोटारीने गोवर्धन गोशाळा, करंजे-साटमवाडी, ता. कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता गोवर्धन गोशाळा, करंजे-साटमवाडी ता कणकवली. येथे आगमन, दुपारी 2.15 वाजता गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 3.20 वाजता मोटारीन करंजे गोशाळा हेलिपॅड, ता. कणकवलीकडे प्रयाण, दुपारी 3.25 वाजता गोशाळा हेलिपॅड, ता. कणकवली येथे आगमन, दुपारी 3.30 वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 3.45 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन, दुपारी 3.50 वाजता विमानाने प्रयाण