वन्यहत्तीचा मोर्चा झोळंबेकडे..
दोडामार्ग
६ मे रोजी रात्री तळकट भागात असणारे वन्यहत्ती आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झोळंबे गावात दाखल झाले आहेत. झोळंबेतील राऊळवाडी, भिडेवाडी भागात फिरुन दिवसा हत्ती इंदळवाद, शिदावर जंगलात असल्याची माहिती वनअधिकार्यांनी दिली आहे. एकूण पाच हत्ती दाखल झाल्याने झोळंबे ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले आहे..