You are currently viewing सरपंचांच्या आंदोलनाला यश

सरपंचांच्या आंदोलनाला यश

सरपंचांच्या आंदोलनाला यश;

माजगावला लवकरच कायमस्वरूपी ग्रामविस्तार अधिकारी मिळणार

ओरोस

माजगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी मिळावा यासाठी आज ग्रामपंचायतील सत्ताधाऱ्यांनी येथील जिल्हा परिषद कार्यालय समोर आंदोलन केले. यावेळी येत्या १० दिवसात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यासाठी माजी आमदार राजन तेली यांनी मध्यस्थी केली.

गेले ८ ते ९ महिने हे रिक्त असलेले माजगाव ग्रामपंचायती मधील ग्रामविकास अधिकारी पद भरण्यात यावे त्या ठिकाणी तात्काळ नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी आज सरपंच अर्चना सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य,संजय कानसे, विशाखा जाधव, ज्ञानेश्वर सावंत, रिचर्ड डिमेलो, अशोक धुरी, माधवी भोगण, मधु कुंभार, तसेच ग्रामस्थ अजय सावंत, सचिन बिर्जे , विक्रम नाईक, अनिकेत सावंत आधी उपस्थित होते.

यावेळी त्या ठिकाणी आलेल्या यावेळी राजन तेली यांनी जिल्हा प्रशासना सोबत जाऊन चर्चा केली व मध्यस्थीअंती येत्या १० दिवसात ग्राम विकास अधिकारी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − two =