*सीड बॉल : हरित भविष्य घडवण्याचा सोपा मार्ग! – गणेश नाईक*
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचारांची रुजवणूक करणे, स्थानिक जैवविविधता वाढवणे तसेच वृक्षलागवड व निसर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पालकांनी आपल्या पाल्याॱकडून सीड बॉल बनवून घेणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी आपल्या जिल्हा परिषद मार्फत शालेय विद्यार्थ्यांकडून सीड बॉल बनविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेला होता. त्यात जिल्ह्यातील बहुतेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. अशाप्रकारच्या उपक्रमांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदचा उपक्रम म्हणून पालकांनी काहीसे दुर्लक्ष केलेले असले तरी आता पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन सुट्टीमध्ये सीड बॉल बनवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आज झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे, जंगलतोड व मोकळ्या जागा कमी होत आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतोय. सीड बॉल हा हरित आच्छादन वाढवण्याचा एक सोपा मार्ग आहे. प्रदूषण, तापमानवाढ, पावसाचे चक्र बिघडणे यांसारख्या समस्यांवर झाडं लावणं हा प्रभावी उपाय आहे. सीड बॉलद्वारे झाडं सहज लावता येतात. मातीची धूप व बंजर जमीन वाढत आहे. मातीची धूप व नापीक होणारी जमीन यावर झाडं लावल्याने नियंत्रण मिळवता येतं. सीड बॉल बंजर किंवा डोंगराळ भागात सहज फेकता येतो. झाडं भूजल पातळी वाढवतात व पावसाचं पाणी जमिनीत साठवून ठेवतात म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडांची गरज आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष झाडं लावणं, काळजी घेणं याचा अनुभव मिळाला तर निसर्गाची खरी जाणीव होते. सीड बॉल बनवण्यासाठी महागड्या साधनांची गरज नाही आणि हे सर्वत्र सहज वापरता येतं.
सीड बॉल म्हणजे काय असा प्रश्न काहीजणांना पडला असेल. सीड बॉल म्हणजे बीजगोळी – बीज (बी) + माती (माती) + कंपोस्ट (सेंद्रिय खते) यांच्या मिश्रणाने बनवलेली लहान गोल आकाराची गोळी. हे एक सोपं व स्वस्त तंत्र आहे ज्याद्वारे झाडांची लागवड किंवा निसर्ग पुनरुत्थान सहज शक्य होतं. विशेषतः ज्या ठिकाणी थेट बियाणं पेरणं अवघड असतं जसे डोंगराळ, बंजर किंवा कठीण भूभाग अशा ठिकाणी हे फार उपयोगी पडतं.
सीड बॉलद्वारे निसर्गात अधिक झाडं उगवली जातात, त्यामुळे हवा शुद्ध होते, प्रदूषण कमी होतं आणि परिसर हरित बनतो. स्थानिक झाडं व वनस्पती वाढल्यामुळे पक्षी, फुलपाखरं, मधमाशा यांसारख्या प्राण्यांनाही निवासस्थान मिळतं. झाडं जमिनीची धूप रोखतात आणि जमिनीची सुपीकता वाढवतात. झाडांचं मूळ पाण्याला मातीमध्ये साठवून ठेवतं, त्यामुळे भूजल वाढतं व दुष्काळी भागालाही मदत होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून झाडांचं जीवनचक्र, त्यांची काळजी कशी घ्यावी हे समजतं. सीड बॉल तयार करणं सोपं आहे व कोणतीही महागडी साधनं लागत नाहीत त्यामुळे सर्व वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे सहकार्य, एकत्रित प्रयत्न व जबाबदारी याचाही विकास होतो. आज लावलेली झाडं पुढच्या पिढ्यांना शुद्ध हवा, सावली, फळं व औषधं देतात म्हणजे दीर्घकालीन फायदा होतो.
सीड बॉल हे कोणालाही घरी बनवता येतात. हे बनवायला सुलभ व कमी खर्चिक आहेत. सीड बॉल बनविण्यासाठी विशेष साधने सुद्धा लागत नाहीत. जमिनीत नांगरणी न करता प्राकृतिकरित्या रोप उगवण्याची संधी मिळते. माती व सेंद्रिय खतामुळे बियाण्याला सुरुवातीला आवश्यक पोषण मिळतं. सीड बॉलमुळे बियांना बाहेरून संरक्षण मिळते त्यामुळे बीज टिकून राहतं व नष्ट होण्याचा धोका कमी होतो. सीड बॉल मोठ्या प्रमाणात फेकून अनेक झाडं उगवता येतात. असे सीड बॉलचे फायदे आहेत.
सीड बॉल तयार करणे खूपच सोपे असून सुरुवातीला स्थानिक वनस्पतीच्या बिया गोळा कराव्यात जसे करंजी, गुलमोहर, सीताफळ, आवळा, जांभूळ, इतर रानझाडं इत्यादी. त्यानंतर पाच भाग सेंद्रिय किंवा बारीक गाळयुक्त माती, तीन भाग गोवरखत किंवा गांडूळ खतासारखे सेंद्रिय कंपोस्ट खत मिसळावे. माती व खत नीट मिसळून त्यात थोडं-थोडं पाणी टाकत घट्ट गोळा तयार करा. प्रत्येक गोळीत एक-दोन (जास्तीत जास्त ५/६) बियाणं टाका. बियाणे टाकल्यानंतर साधारण लाडवाएवढ्या आकाराच्या गोळ्या तयार करा. बनविलेल्या गोळ्या सावलीत दोन ते तीन दिवस नीट वाळवा. झाले आपले सीड बॉल तयार ! आता आपले तयार झालेले सीड बॉल पावसाळ्याच्या सुरुवातीला हव्या त्या मोकळ्या जागेत फेकण्यासाठी तयर झालेत.
करंजी, गुलमोहर, बाभूळ, नीम (कडुनिंब), आवळा, सीताफळ, रानजांभूळ, मोह ही सीड बॉलसाठी उपयुक्त झाडे आहेत. सीड बॉलचा वापर डोंगराळ व बंजर भूभागात, रस्त्याच्या कडेला, शालेय परिसरात, सामाजिक वनीकरण उपक्रमात करता येतो. सीड बॉल बनविल्यामुळे मुलांमध्ये पर्यावरणपूरक विचारांची रुजवणूक होते. त्यांच्यामध्ये वृक्षलागवड, निसर्ग व पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढते. निसर्गप्रेम व सामूहिक कार्य व अनुभवातून शिकता येते. बीजांचे महत्त्व आणि झाडांचे जीवनचक्र समजण्यास मदत होते.
सीड बॉल मुलांकडून बनवून घेताना काही काळजी घेणे गरजेचे आहे आहे जसे की, लहान मुलांना बियाणं तोंडात न घालण्याची सूचना देणे आवश्यक आहे. शक्यतो स्थानिक व जलद उगम होणारी बियाणं सीड बॉलसाठी वापरली गेली पाहिजेत. शक्य असल्यास अंकुरित झाडांची नोंद ठेवणे व संवर्धनासाठी पाणी देण्याचे नियोजन करावे. झाड उगवल्यानंतर त्याचं चित्र, वाढ, पाने यांची माहिती लिहिणे आदी गोष्टी आपण मुलांकडून करून घेऊ शकतो. शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला (पहिल्या जोरदार पावसाच्या वेळेस) सीड बॉल फेकावेत. कडुनिंब, करंजी, गुलमोहर, बाभूळ, आवळा यांसारखी जलद उगमणारी व स्थानिक झाडांची बियाणं वापरावीत. ५-६ बियाणं प्रति सीड बॉल वापरल्यास संधी वाढते परंतु त्यापेक्षा फार जास्त बिया घेऊ नयेत.
सीड बॉलद्वारे झाडं उगवण्याचं (अंकुरणाचं) प्रमाण अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. सरासरी ३० % ते ६०% पर्यंत बीज उगवण्याचं प्रमाण नोंदवलं जातं. काही वेळा योग्य परिस्थितीत ते ७०% पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. योग्य काळ आणि चांगली तयारी केल्यास ६०% पर्यंत झाडं उगवतात. म्हणजे प्रत्येक १०० सीड बॉलमध्ये साधारण ५०–६० झाडं उगवू शकतात. सीड बॉलसाठी झाडं निवडताना स्थानिक झाडं निवडा ती त्या परिसरात टिकाऊ असतात. जलद उगमणारी व कमी पाणी लागणारी झाडं प्राधान्य देणे गरजेचे आहे. नायट्रोजन स्थिरीकरण करणारी झाडं उदा. करंजी, बाभूळ मृदासंवर्धनासाठी चांगली असतात. पक्ष्यांसाठी व फळांसाठी उपयुक्त झाडं निवडल्यास जैवविविधता वाढते. मग तुम्हीही सुट्टीत सीड बॉल बनवायला घेणार ना !_____________________________
*संवाद मीडिया*
🚗🚚🛺🚕🚙🚗🚕🚙🚗🚕🚙🚗🚕🚙🚐🚜🚛🏍️🛵
*🔺वेदश्री एंटरप्रायझेस*🔺
*Online Payment… Instant Policy..*💳
*सर्व प्रकारचे वाहनाचे इन्शुरन्स काढून मिळतील. प्रत्येक इन्शुरन्स वर २०% पर्यंत डिस्काउंट*🚗🚕🚙
*2️⃣0️⃣ पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपन्याची सर्विस एकाच ठिकाणी*
*👉सर्व गाड्यांची RTO ची कामे करून मिळतील.*
*👉परमिट*
*👉ड्रायव्हिंग लायसन्स*
*👉 गाडी पासिंग*
*👉रोड टॅक्स इ.*🚗🚕🚙
*👉 फास्ट टॅग*
*🔺 VEDSHREE ENTERPRISES*🔺
*🌟”Excellence our policy”*🌟
*प्रोप्रा. आशिष सुधाकर धाऊसकर*
*📍ऑफीस : सालईवाडा, सावंतवाडी, मारुती मंदिर जवळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📲 9405827599*
*8767479516*
*📢📢 Offer 🎊🎊🎉🎉📢📢*
*✅ 🛻 bolero pic up/ Tata ace up to 2500 GVW THIRD party 18000/-*
*💥Discount price 13000/-*
*✅ 🚗 Pvt car up to 998cc Third party 2500/-*
*💥Discount price 2000/-*
*✅ 🛵 Bike/Scooter Third party 850/-*
*💥Discount price 700/-*
*✅ 🚚Eicher/tata Dumper//Tipper third party 39000*
*💥Discount price 32000/-*
*✅ 🛺 reksha Third Party 7000/-*
*💥Discount price 5000/-*
*👉👉 ऑफर मर्यादित कालावधीसाठी*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/169622/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*