नांदगाव मध्ये भातबियाणे खरेदी शुभारंभ

नांदगाव मध्ये भातबियाणे खरेदी शुभारंभ

कणकवली

कणकवली तालूक्यातील नांदगाव विविध कार्य.सेवा.सोसा.मध्ये नुकतेच भातबियाणी शुभारंभ चेअरमन रविंद्र तेली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन रविंद्र तेली, व्हाईस चेअरमन सुनिल पवार संचालक व ओटव सरपंच हेमंत परूळेकर, संचालक विठोबा म्हाडेश्वर, पृथ्वीराज खोत, शशिकांत तोरस्कर, आनंद नरसाळे, धर्माजी तांबे, हरिश्चंद्र बिडये, वासुदेव गावकर, रमेश फटकारे, रमिजानबी बटवाले, सौ.स्वाती खडपे, संस्थेचे सेक्रटरी अजय गोसावी, लिपीक दिप्ती नांदगावकर, संस्थेचे सभासद गावातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थीत होते. शेतक-यांच्या भात पीकाला योग्य भाव मिळावा या हेतूने शेतक-यांचे भात बियाणी घेण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा