You are currently viewing तुझं नी माझं

तुझं नी माझं

तुझं नी माझं,
हे रोजचंच झालंय..
मी तुझ्यावर रागावणं,
तू गाल फुगवून, डोळे मिटून,
गुपचूप बसणं.

जाणतेपणी मुद्दामहून,
तुझ्याकडे न बघणं.
तुझ्या राग काढण्याकडे,
दुर्लक्ष करणं.

माझ्या डोळ्यात डोळे घालून,
तू हळवी समजूत काढणं.
माझा हात हाती घेऊन,
हलकेच त्याचं चुंबन घेणं.

तुझं माझ्या जवळ येऊन,
मला आपल्या मिठीत घेणे.
तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहून,
माझं मन पिघळणे…

तुझं नी माझं…
हे रोजचंच झालंय…!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 2 =