*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०२/०५/२०२५ रोजी माडाची वाडी पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये माडाची वाडीचे गावचे सरपंच माननीय गावडे सर, माडाची वाडी उपसरपंच गावडे मॅडम, ग्रामसेवक सर व ग्रामपंचायत सदस्य, तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी प्रणाली दळवी, विशाखा कासले,संजना गावडे,दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच गावडे सर यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले.संस्था कर्मचारी दळवी मॅडमानी संस्थेचे अहवाल वाचन केले.पाच दिव्यांग बांधवांना पेन्शन योजना करण्यासाठी फॉर्म देण्यात आले व त्यासंबंधी सर्व माहिती व कागदपत्रे सांगण्यात आले.सहा दिव्यांग बांधवांना गाडीसाठी फॉर्म देण्यात आले व त्यासंबंधी सर्व माहिती सांगितली. सात दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली.या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते.चहा व नाश्ताची व्यवस्था माडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.