‘लुंबिनीवन बुध्द विहाराचे’ १५ मे रोजी उद्घाटन व लोकार्पण सोहळा
कणकवली
भारतीय बौध्द महासभा गावं शाखा जानवली जानवली बौध्द विकास संघ, मुंबई व ग्रामीण
लुंबिनीवन बुध्द विहार, मु. पो. जानवली, ता. कणकवली, यांच्या विद्यमाने गुरूवार दिनांक १५ मे २०२५ व शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी ‘लुंबिनीवन बुध्द विहार’ उद्घाटन व लोकार्पण सोहळा साजरा होत आहे.
विश्ववंदनीय, महाकारूणिक, तथागत भगवान गौतम बुध्द आणि विश्वरत्न, भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव, बोधिसत्व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ लगत दि. १५ मे १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत असेलेल्या मौजे जानवली, ता. कणकवली, जि. सिंधुदूर्ग येथील ‘लुंबिनीवन बुध्द विहार’ चा जीर्णोध्दार उपरांत उद्घाटन आणि विश्व्वंदनीय महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या पंचधातूंनी बनवलेल्या मुर्तीची विधिवत प्रतिष्ठापना तसेच विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
या कार्यक्रमासाठी उदूघाटक आदरणीय डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब (राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष, भारतीय बौध्द महासभा, कमांडर इन चीफ, समता सैनिक दल)
पू. भंते धम्मानंद (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, वेणुनगर, वाकड, पुणे)पू.भंते कश्यप (अंबरनाथ)
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. सुनिल लक्ष्मण पवार अध्यक्ष – जानवली बौध्द विकास संघ, मुंबई तर
स्वागताध्यक्ष आयु. अजित सखाराम पवार सरपंच ग्रामपंचायत, जानवली) अध्यक्ष जानवली बौध्द विकास संघ, ग्रामीण असणार आहेत.