You are currently viewing क्षितिजने आय ए एस होण्याचे आपले स्वप्न साकारले……..

क्षितिजने आय ए एस होण्याचे आपले स्वप्न साकारले……..

*क्षितिजने आय ए एस होण्याचे आपले स्वप्न साकारले……..*

*मिशन आय ए एस ने केला क्षितिज गुरभेले यांचा सत्कार*

अमरावती

वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होऊन अमरावतीच्या यशोदा नगर बायपास रोड वरील चैतन्य कॉलनीतील शांतीनगर मध्ये “पाऊल “या निवासस्थानी राहणाऱ्या क्षितिज संजय गुरभेले या विद्यार्थ्याने आयएएसच्या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केलेले आहे .कोणत्याही प्रकारचा शिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करून त्याने हे यश संपादन केलेले आहे .याबद्दल आज मिशन आय ए एस तर्फे त्याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार करण्यात आला. क्षितिजने आयआयटी रुडकीवरून पदवी प्राप्त केली असून त्याला त्यानंतर प्राप्त झालेली सत्तावीस लाख रुपयांची नोकरी त्याने नाकारली व आय ए एस च्या तयारीला सुरुवात केली व पहिल्याच प्रयत्नामध्ये आयएएस प्राप्त केले .वयाच्या २४ व्या वर्षी आयएएस होणारा हा अमरावती शहरातील पहिला विद्यार्थी आहे.
त्याचे वडील अमरावतीच्या श्याम चौकातील बी एस एन एल कार्यालयात मुख्य लेखाधिकारी म्हणून कार्यरत असून क्षितिज हा मूळचा भोपाळचा राहणारा आहे. वडीलांची अमरावती येथे १९७१ यावर्षी बदली झाली आणि भोपाळचे कुटुंब अमरावतीला आले. दिल्लीला जाऊन अभ्यास केल्यापेक्षा अमरावतीलाच आपल्या घरी आपल्या परिवारात राहून त्याने हे यश संपादन केलेले आहे .खरं म्हणजे हे सर्व करण्यासाठी त्याला कुठल्याही अकादमीची किंवा कुठल्या तज्ञ माणसाची मदत घेण्याची गरज भासली नाही. स्वबळावर त्याने हे यश संपादन केलेले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याने हा अभ्यास केलेला आहे. मिशन आय ए एस चे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे व उपसंचालक डॉ. मंगेश देशमुख आज चैतन्य कॉलनीतील शांती नगर भागात जाऊन त्याच्या पाऊल या निवासस्थानी त्याचा शाल व पुस्तके देऊन सत्कार केला. मिशन आय ए एस ने दुसऱ्या वर्गापासून प्रारंभ केलेला ज्युनिअर आयएएस हा प्रकल्प अतिशय चांगला असून विद्यार्थ्यांना दिशादर्शक आहे. मला अशा प्रकारचे मार्गदर्शन शालेय जीवनात मिळाले असते तर मी लवकरच आय ए एस झालो असतो असा अभिप्राय त्याने यावेळेस दिला .अगदी अल्प कालावधीमध्ये क्षितिजने जे यश संपादन केलेले आहे त्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत असून सध्या त्याच्या घरी येणाऱ्या व त्याचे अभिनंदन करणाऱ्या लोकांची व संस्थांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. मिशन आय ए एस ने त्याच्या वडिलांचा व आई सुनिताताईंचा व बहीण कुमारी आदिती यांचाही सन्मान केला. क्षितिज हा सध्या अमरावतीलाच असून मिशन आय ए एसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तो मिशन आयएएसने आयोजित केलेल्या ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराला भेट देऊन त्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणार आहे . विशेष हे की अमरावतीकरांसाठी क्षितिज हा अमरावतीला उपलब्ध असून आयएएस करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्षितिजची भेट घेऊन आपल्या स्पर्धा परीक्षेच्या जीवनाकडे यशस्वी वाटचाल करावी असा आशावाद या प्रसंगी व्यक्त करण्यात आला .
==============
प्रकाशनार्थ *प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003*

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =