कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व पक्ष निरीक्षक बशीर मुर्तजा हे शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कुडाळ येथे येणार आहेत. यावेळी उद्या दुपारी २ वाजता कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास येथे कार्यकारणी बैठक व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रांतिक सदस्य प्रसाद रेगे, विठ्ठल डान्टस, कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे, सुरेश दळवी आदी उपस्थित राहणार आहेत.

कुडाळात उद्या ३ मे रोजी आम. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मेळावा
- Post published:मे 2, 2025
- Post category:कुडाळ / बातम्या / राजकीय / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments