You are currently viewing भाजप चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्षपदी गितेश शेणई

भाजप चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्षपदी गितेश शेणई

जिल्हा महिला अध्यक्षपदी नमिता गावकर यांची निवड…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्ती!m

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा भाजप चित्रपट आघाडी यांच्या वतीने कार्यकारिणी सभे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत चित्रपट सृष्टीत जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील कलाकार नावारूपाला येऊन त्यांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून जिल्हा चित्रपट आघाडी अध्यक्ष म्हणून गितेश शेणई तर महिला भाजप चित्रपट आघाडी अध्यक्ष नमिता गावकर यांची नियुक्ती केंद्रीय मंत्री राणे हस्ते करण्यात आली.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प.अध्यक्ष संजना सावंत, माजी आमदार अजित गोगटे, जि.प.गटनेते रणजित देसाई, भा.जि. महिला अध्यक्ष संध्या तेरासे,कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे,सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब,वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिराप आदी उपस्थित होते. तर य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जयदेव कदम यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा