सावंतवाडी :
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोबाईल क्षेत्रात दर्जेदार सेवा देणारी कोकणातील पहिली इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्या “डॉ फोन” या मोबाईल स्मार्ट इलेक्ट्रॉनिक शोरूम व सर्विस सेंटरचे उद्घाटन आज सकाळी सावंतवाडी येथे फित कापून करण्यात आले. तळवडेत मिळालेल्या भरघोस यशानंतर सावंतवाडीतील युवा उद्योजक मिहीर मठकर यांच्या माध्यमातून गांधी चौक येथील दत्तात्रय निवास या अपार्टमेंटमध्ये ही शाखा सुरू करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी एस अँड टी हब प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिहीर मठकर, संस्थापक पंकज सावंत, संचालक स्नेहा सावंत, सह संस्थापक पराग सावंत, लौकिक परब, सौ.सीमा मठकर, मिलिंद मठकर, किशोर सावंत, सरिता सावंत, गौरी परब, बंटी भांबुरे आदी उपस्थित होते. तसेच डॉ. फोनच्या नव्या दालनाला अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती दर्शविली.
या ठिकाणी नामांकित कंपन्यांचे मोबाईल आणि स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. आयफोन, सॅमसंग, रियलमी, विवो, ओप्पो यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्ससोबतच मोटोरोला, गुगल पिक्सल, वनप्लस, बोट, फायर-बोल्ट, नॉइज, डेल, असुस आणि लेनोवो यांसारख्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी येथे मिळणार असून डॉक्टर फोनच्या या मोबाईल शोअरूमला तुम्हीही एकदा अवश्य भेट द्या, असे आवाहन मिहिर मठकर यांनी केले आहे.