You are currently viewing जयवंत पाटील यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार  

जयवंत पाटील यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार  

जयवंत पाटील यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

सावंतवाडी
दाणोली येथील कै बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. गोवा साखळी येथे बेळगावी येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीच्यावतीने कर्नाटक राज्याचे पोलीस कमांडर अरविंद गट्टी यांच्याहस्ते कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, गोवा राज्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी प्रशांत नाईक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात जयवंत पाटील यांनी पुरस्काराचे श्रेय कै बाबुराव पाटेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष झिला पाटयेकर, संस्थेचे विद्यमान पदाधिकारी सहकारी शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या उत्कृष्ट सहकार्याला दिले. कै बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील सावंतवाडी तालुका विद्या सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन असुन त्यांच्या शैक्षणिक कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारसाठी निवड करण्यात आली.नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीचे कार्यक्षेत्र असलेल्या पाच राज्यातून जयवंत पाटील यांची राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जयवंत पाटील यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे कै बाबुराव पाटेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद नाईक, संस्थेचे इतर पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा