जानवली साई सृष्टी, ओम साई सदनिकाधारकांचे उपोषण सतीश सावंत यांच्या मध्यस्थीने स्थगित…

जानवली साई सृष्टी, ओम साई सदनिकाधारकांचे उपोषण सतीश सावंत यांच्या मध्यस्थीने स्थगित…

२८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांसोबत सदनिकाधारकांची बैठक घेत निर्णय घेणार, सतीश सावंत यांची माहिती

कणकवली: ​

जानवली येथील सदनिकाधारकानीं आपल्या मागण्यांसाठी केलेले लाक्षणिक उपोषण अखेर शिवसेना नेते जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मध्यस्थीने ​२८ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आले. सदनिकाधारकांच्या प्रश्नाबाबत ​२८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल व संबंधित ट्रांसफार्मर अनधिकृत बसवणाऱ्या अधिकारी व ​ वीज वितरणाच्या ​ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सतीश सावंत यांनी दिली. सदर ट्रान्सफार्मर बसवते वेळी विद्युत निरीक्षक यांची परवानगी नसल्याने तो ट्रांसफार्मर अनधिकृत असल्याची बाब समोर आल्याचे सावंत यांनी सांगितले. सदर प्रश्न पालकमंत्र्यांकडे मांडण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरणचे अधिकारी व ओम साई गृहनिर्माण सोसायटी व साई सृष्टी गृहनिर्माण सोसायटी यातील सदनिकाधारकांना सोबत कणकवलीत बैठक घेण्यात येईल. व त्यात या प्रश्नी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सदनिकाधारकांना देऊन उपोषण स्थगित केल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, ऍड. हर्षद गावडे, दामू सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, सत्यवान राणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा