सावंतवाडी :
राज्यभरात यशस्वी गाजलेले आणि पाच हजाराहून प्रयोगांचा विक्रम गाठलेले सुप्रसिद्ध नाटक ‘वस्त्रहरण’ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत नाट्यरसिकांच्या खास भेटीला येत आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा नाट्यप्रयोग येत्या २९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सादर होणार आहे. प्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्त्रहरण’ हे नाटक विनोद, संगीत आणि सामाजिक भाष्य यांचा सुंदर मेळ साधणारे आहे. प्रसाद कांबळी यांच्या सादरीकरणात हे नाटक रसिकांना एक आगळावेगळा अनुभव देणार आहे. दिगंबर नाईक, पुष्कराज चिरपुटकर, रेशम चिटणीस, ईश्वरी आंबे, प्रियदर्शन जाधव, अशुमंन विचारे, ओंकार गोवर्धन, सुनील तावडे, अरुण कदम, राजेश भोसले, उमाकांत पाटील, रोहन गुजर, मुकेश जाधव, प्रणव राव राणे, सचिन सुरेश, विक्रांत कोळपे, वैभव पिसाट, वैभव चव्हाण आदींसह अनेक लोकप्रिय कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत. संगीताची बाजू अमित पाध्ये, संदेश कदम, वैभव जोशी, तर गायनाची बाजू मयुरी कुडाळकर सांभाळणार आहेत.या कार्यक्रमासाठी मीडिया पार्टनर म्हणून तरुण भारत संवाद ची साथ लाभली आहे. तसेच व्ही फोर कन्सल्टन्सी सावंतवाडी, बँक ऑफ महाराष्ट्र सावंतवाडी, एस. एम. मडकईकर ज्वेलर्स सावंतवाडी आणि खेमराज (बाबू) कुडतरकर माजी नगरसेवक आणि उदयोजक सावंतवाडी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम साकार होत आहे. या नाटकासाठी तिकीट विक्री सुरु असून, नाट्यरसिकांनी या दुर्मिळ संधीचा लाभ घ्यावा ,अधिक माहितीसाठी लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नजीकच्या शाखांना भेट द्या ८८८८७७७७३० आणि ९१६८२४५८२४ वर संपर्क साधण्याचे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.