You are currently viewing बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्तं कृती समितीच्या प्रयत्नांना यश.- प्राजक्त चव्हाण*

बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्तं कृती समितीच्या प्रयत्नांना यश.- प्राजक्त चव्हाण*

कुडाळ :

सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार यांची वेबसाईट सर्वासाठी खुली व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्या अनुषगाने संयुक्तं कृती समिती मधील श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. नाम. आकाश फुंडकर व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालय येथे व खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची जुहू येथील अधीश बंगल्यावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. तसेच त्या नुसार पाठपुरावा चालू होता. कृती समिती प्रमुख प्रसाद गावडे, श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, रत्नसिंधू कामगार संघटना अध्यक्ष अशोक बावलेकर, निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, कोकण श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष संतोष तेली, इमारत बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश दळवी या सर्व संघटनेच्या अध्यक्ष यांनी कामगारांची साईट सर्वासाठी खुली करावी ही आग्रही मागणी करण्यात आली होती.

श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री. प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. श्री. आकाश फुंडकर व मंत्री महोदय यांची भेट घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने गेला महिनाभर प्रयत्न सर्व संघटना अध्यक्ष यांच्या मार्फत पाठपुरावाही चालू होते. संयुक्तं समितीच्या पाठपुराव्याला आज यश संपादन झाले व आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर कामगार मंत्री व आयुक्त यांनी सदर साईट चालू करून सर्वासाठी खुली करून दिलेली आहे. त्यामुळे संयुक्तं कृती समिती च्यावतीने पहिल्या प्रयत्नांना यश मिळालेले आहे. कामगार मंत्री श्री. फुंडकर, नारायणराव राणे, चंद्रशेखर बावनकुळे साहेब व कामगार सचिव श्री. कुंभार यांचे कामगार वर्गाकडून आभार मानण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा