नगररचना विभागाच्या भ्रष्टाचारा विरूद्ध डी. के. सावंत यांचे उपोषण

नगररचना विभागाच्या भ्रष्टाचारा विरूद्ध डी. के. सावंत यांचे उपोषण

सावंतवाडी

सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर नगररचनाकार यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची सुरुवात लाक्षणिक उपोषणाने करण्यात आली. डि. के. सावंत यांनी अनोख्या पध्दतीनं पेहराव करत आपला रोष व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगररचना विभागातील भ्रष्टाचार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच होत असल्याने नगररचनाकार हे अव्याहतपणे भ्रष्टाचार करून आपल्या तुंबड्या भरत आहेत. यावर शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास अहमदनगर विभागात घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत डी के सावंत यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा