कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची सभा आज*
कणकवली
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीची विस्तारित कार्यकारिणी सभा शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता जि. प. पू. प्रार्थामक शाळा कणकवली नं. ३ येथे आयोजित करण्यात आली आहे. शाखाध्यक्ष सुशांत मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. नूतन तालुका कार्यकारिणीमधील उर्वरित पदांवर निवड करणे, आणि सभासद नोंदणी आढावा, आदी प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य आणि सर्व सभासदांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव नीलेश ठाकुर यांनी केले आहे.
