You are currently viewing जामसंडे येथे दुचाकी व टेम्पो अपघातात एकाचा मृत्यू

जामसंडे येथे दुचाकी व टेम्पो अपघातात एकाचा मृत्यू

जामसंडे येथे दुचाकी व टेम्पो अपघातात एकाचा मृत्यू; टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

देवगड

जामसंडे- कट्टा येथील ‘घाडणीचे पाणी’ येथील रस्त्यावर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार महेश धानोजी सावंत (४०, मूळ रा. बेळगाव, सध्या रा. तळेबाजार) हा जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री ९ वा. च्या सुमारास घडला. या अपघातप – करणी टेम्पोचालक प्रशांत प्रकाश पवार (३२, रा. साई कॉलनी, ता. मिरज, जि. सांगली) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार महेश सावंत हे सोमवारी रात्री ९ वा. च्या सुमारास देवगडहून तळेबाजारच्या दिशेने जात होते. जामसंडे कट्टा येथील ‘घाडणीचे पाणी’ याठिकाणी त्यांच्या दुचाकीच्या मागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात टेम्पोची धडक दुचाकीला बसली. या अपघातात महेश सावंत हे गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच कट्टा, तळेबाजार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. देवगडचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, हवालदार विजय बिर्जे, आशिष कदम, श्री. भोवर, कणकवलीचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक श्री. देठे, मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, आचरा पोलीस उपनिरीक्षक श्री. पोवार आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. देवगड पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. मंगळवारी सकाळी देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून महेश सावंत यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची फिर्याद सतीश बाबाजी कदम (५७, आरे- आरेश्वरवाडी) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून या फिर्यादीनुसार टेम्पोचालक प्रशांत पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (२), महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ चे कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करीत आहेत.

मृत महेश सावंत हे तळेबाजार येथे गेली अनेक वर्षे स्थायिक आहेत. ते घरांच्या प्लास्टरची कामे करीत असत. पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा