You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलचा अभिनव उपक्रम

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा अभिनव उपक्रम

२६ ते ३० एप्रिल दरम्यान लहान मुलांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने २६ ते ३० एप्रिल या कालावधीत लहान मुलांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणारी ही कार्यशाळा रोज संध्याकाळी चार ते सहा या वेळेत भरेल. यामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना वयोगटानुसार तीन गटांमध्ये विभागले जाईल.

तीन ते सहा वयासाठी पहिला गट, सात ते आठ वयासाठी दुसरा गट आणि नऊ ते बारा वयासाठी तिसरा गट असेल. प्रत्येक गटानुसार ज्ञानवर्धक, मनोरंजनात्मक आणि स्पर्धात्मक उपक्रम घेतले जातील. यामध्ये सहभागी होण्यासाठी ७८७५१४९७१७ या क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा