वायरी-उभटवाडी स्मशानशेडसाठी निलेश राणेंच्या माध्यमातून २० लाखाचा निधी…
मालवण
तालुक्यातील वायरी-उभाटवाडी स्मशानशेडसाठी आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून आणि खासदार नारायण राणेंच्या खासदार निधीतून २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पाठपुरावा केला होता. याबद्दल त्यांचा शिवसेना संस्कृतीक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर मंदार लुडबे, वायरी माजी उपसरपंच संदेश तळगावकर, ओंकार लुडबे, अरुण तोडणकर, बाळू नाटेकर, ऋत्विक सामंत, संतोष कोदे, मधुरा तुळस्कर, सोनाली पाटकर, प्रियांका मेस्त्री, निकिता तोडणकर आदी उपस्थित होते.

