विजयदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत बेळगावचे वर्चस्व
५ किलोमीटर १७ वर्षावरील मुलांमध्ये बेळगावचा स्मरण मंगळोरकर प्रथम
१ किमी. ९ वर्षाखालील मुलांमध्ये पूण्याचा शिवांशू खोराटे प्रथम
विजयदुर्ग
विजयदुर्ग येथील दुर्गामाता कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने व कोल्हापूरच्या जिम स्विम अकॅडमीच्या आयोजनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने ८ वी ओपन वॉटर जलतरण स्पर्धा घेण्यात आली. विजयदुर्ग येथील ऐतिहासिक खाडीमध्ये विविध वयोगटासाठी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत वय वर्षे ५ ते वय वर्षे ७० पर्यंतचे १०० स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सभारंभ देवगड तहसीलदार आर. जे. पवार, बंदर निरीक्षक महाडिक, विजयदुर्ग प्रभारी सरपंच रियाझ काझी, सौ संजना आळवे, संदीप गावडे, बाबू डोंगरे, शरद डोंगरे, चंदू बिडये व माजी उपसरपंच महेश बिडये यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेसाठी राज्य जलतरण संघटनेचे स्पर्धा निरीक्षक कैलाश आखाडे होते. सुधीर चोरगे, विश्वेश दूधम , गंगाराम बरगे, शुभांगी मंगळोरकर शैलेश सिंग यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन दुर्गामाता मंडळाच्या सचिव सौ संजना आळवे, रविकांत राणे, दीपक करंजे तसेच जिम स्विम अकॅडमीचे अजय पाठक यांनी केले होते. या स्पर्धेस राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने व सचिव राजेंद्र पालकर तसेच चेअरमन सुधाकर शानभाग यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेला विजयदुर्ग बोटींग क्लबचे सहकार्य मिळाले. दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र या भव्य उपक्रमास त्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
५०० मीटर ७ वर्षाखालील मुले
प्रथम रियांश खामकर (ठाणे),
द्वितीय मयंक चव्हाण (कोल्हापूर),
तृतीय शिवांश खोत (सिंधुदुर्ग),
चतुर्थ गुरुराज पाटील (कोल्हापूर),
पाचवा रुद्रांश लोंढे (संभाजीनगर).
५०० मीटर ७ वर्षाखालील मुली
प्रथम सारा वर्तक (रायगड),
द्वितीय समिधा गेंजगे (नाशिक),
तृतीय लीनांशा नाईक (सिंधुदुर्ग),
चतुर्थ मारया नेगी (मुंबई).
१ किमी ९ वर्षाखालील मुले
प्रथम शिवांशु खोराटे पुणे, द्वितीय हर्षवर्धन कार्लेकर बेळगांव, तृतीय अद्वैत पाटील मुंबई, चतुर्थ अजिंक्य यावलतकर संभाजीनगर. १ किमी. ११ वर्षाखालील मुले प्रथम शिवांश पाटील नाशिक, द्वितीय साईश कड-देशमुख कोल्हापूर, तृतीय कनिष्क नाईक नाशिक, चतुर्थ रुशांत यवतकर सातारा, पाचवा आर्यवीर राऊत संभाजीनगर.
१ किमी ११ वर्षाखालील मुली
प्रथम निधी मुचंडी बेळगांव, द्वितीय वसुंधरा कसबे नाशिक, तृतीय विभूती पाटील नाशिक, चतुर्थ सिद्धी चव्हाण सिंधुदुर्ग, पाचवा समिप्ता व्हावळ ठाणे. २ किमी १३ वर्षाखालील मुले. प्रथम विहान कोरी बेळगांव, द्वितीय बी साई श्री हर्षीथ तेलंगणा, तृतीय आयु आलदोरिया नाशिक, चतुर्थ स्वराज पांढरे अमरावती, पाचवा आलोक गवळी कोल्हापूर. २ किमी १३ वर्षाखालील मुली. प्रथम अनन्या पत्की कोल्हापूर, द्वितीय स्वरा गावडे सिंधुदुर्ग, तृतीय अनिका बर्डे बेळगांव, चतुर्थ शरण्या नेगी मुंबई, पाचवा माही घडी पालघर.
२ किमी ५१ वर्षावरील पुरुष.
प्रथम रमेशकुमार बंग कोल्हापूर,
द्वितीय अरुण जाधव बेळगांव,
तृतीय मुकेश शिंदे बेळगांव, चतुर्थ सुनील कुमार कोट्टरी तेलंगणा, पाचवा सौरभ मारखेडकर पुणे.
५१ वर्षांवरील महिला. प्रथम असिता पवार पुणे, २ किमी ६१ वर्षावरील पुरुष. प्रथम सिद्धप्पा मोटे कोल्हापूर, द्वितीय सचिन मुंज पुणे, तृतीय विक्रम देशमाने नाशिक, चतुर्थ दिपक भोसले नाशिक, पाचवा सुहास पवार मुंबई. २ किमी ६१ वर्षांवरील महिला. प्रथम गायत्री फडके पुणे. ३ किमी. १५ वर्षांखालील मुले.
प्रथम आदित्य बरगे बालेवाडी,
द्वितीय निरंजन यादव बालेवाडी,
तृतीय वरुणराज डोंगळे बालेवाडी,
चतुर्थ मेघराज डोंगळे कोल्हापूर,
पाचवा बंद्रि साई श्री प्रणीथ तेलंगणा. ३किमी १५ वर्षाखालील मुली. प्रथम चित्रांनी नवले सातारा,
द्वितीय प्राजक्ता प्रभू बेळगांव, तृतीय आरोही यवतकर सातारा. ३ किमी. १७ वर्षांखालील मुले. प्रथम प्रसाद सायनेकर बेळगांव, द्वितीय मयुरेश जाधव बेळगांव, तृतीय सोहम शेलार सातारा, चतुर्थ विश्वा शिंदीकर सातारा. ३ किमी १७ वर्षांखालील मुली. प्रथम श्रेष्ठा रोट्री बेळगांव,
द्वितीय जान्हवी राऊत औरंगाबाद,
तृतीय जुई गांवकर कोल्हापूर.
५ किमी १७ वर्षांवरील मुले.
प्रथम स्मरण मंगळोरकर बेळगांव,
द्वितीय धैर्यशील भोसले कोल्हापूर,
तृतीय पुष्कर गवळी कोल्हापूर.
५ किमी २१ वर्षांवरील मुले. प्रथम ध्रुव देशमाने नाशिक, द्वितीय आनेश आव्हाड ठाणे

