*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”चैत्र गौरी पूजन”*
चैत्रगौरीचे आम्ही करितो आदरे स्वागत
सोन पावले यावे सोन उंबरा ओलांडून IIधृII
यावे हळदी कुंकू पावलावर पद ठेवीत
परातीतल्या झुल्यावर व्हावे विराजमान
झुला हलवतो भावे माते वाटे प्रसन्नII1II
गौरी येते माहेरा चैत्र शुक्ल तृतीयेपासून
चैत्रगौरीचा असे श्रीमंत न्याराच थाट
सख्या सुवासिंनी ओवाळती निरांजनानंII2II
मोगरा फुलांनी गौरी लक्ष्मीचे करू पूजन
गौरी पुजनानं ऐश्वर्याची अनुभूती मिळत
सासुरवासिनींचे माहेरी होतं सन्मानII3II
नववर्ष झाले सुरू कोकिळ करिती कूजन
आम्रवृक्ष देती फळे सृष्टी जाई बहरून
नैवेद्य राहे अंबाडाळ पन्हे खोबरे खिरापतII4II
पारंपारिक वार्षिक वसंताचे करू स्वागत
ऋतू बदलाची जाण सहनशक्ती वाढवीत
गौरीचे करू पूजन सुखी होई जीवनII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

